सातारा जिल्हा प्रतिनीधी: – निलेश कोकणे
श्री विठ्ठल परम भक्त श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांचा 675 वा संजीवन समाधी सोहळा खूप मोठ्या भक्तीभावाने समस्त दहिवडी येथील सर्व शिंपी समाज बांधवांच्या व ग्रामस्थांच्या वतीने साजरा करण्यात आला.
आदल्या दिवशी श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. श्री क्षेत्र गोंदवले येथील भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.दुसऱ्या दिवशी ठीक 10 ते 12/30 वाजेपर्यंत झी टॉकीज फेम ह. भ. प समाज प्रभोधनकार संस्कार महाराज खंडागळे संगेवाडी (पंढरपूर ) यांचे खूप छान असे सुश्राव्य कीर्तन झाले. व नंतर सर्व उपस्थित्तानां महाप्रसाद देण्यात आला.
यंदा चालू वर्षी सर्व युवक मंडळाच्या वतीने मजबूत सुबक रेखीव अशी स्टेनलेस स्टीलची पालखी देण्यात आली. याच पालखीतून श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांची टाळ मृदूंगाच्या गजरात भजन आणि भक्ती गिते म्हणत संपूर्ण ग्राम प्रदक्षिणा करण्यात आली.श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुगडीचा कार्यक्रम खूप छान पार पडला.
अनेक समाज बांधवांच्या वतीने ठीक ठिकाणी सडा रांगोळ्या काढून पालखीचे स्वागत करण्यात आले. या पालखी सोहळ्यात मध्ये सर्व समाज बांधव महिला वर्ग बहुसंखेने उपस्थित होते.

