विदर्भ विभाग प्रतिनीधी: – युसूफ पठाण
अट्टल चोरट्यास बेड्या : वर्धा शहर पोलिसांची कारवाई…
वर्धा : अट्टल दुचाकी चोराला ताब्यातघेत हिसका दाखवला असता त्याने शहर हद्दीतील दोन दुचाकी चोरून बुनियादी शाळेजवळील झाडाझुडपात लपवून ठेवल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी पंचासह जात दोन्ही दुचाकी हस्तगत करून अट्टल चोरटा सुनील आनंद कांबळे रा. नालवाडी यास अटक केली.
पोलिस पथक गस्तीवर असताना त्यांना एक जण चोरीच्या दुचाकी विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार दरम्यान पोलिसांनी सुनील कांबळे याला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने १५ ते २० दिवसांपूर्वी दोन दुचाकी चोरी केल्या असून विक्रीसाठी ग्राहक न मिळाल्याने झाडाझुडपात लपवून ठेवल्या असल्याचे सांगितले.
पोलिसांनी एमएच.३२ एएफ. ७८४३, एमएच.३२ एसी. १०२४ क्रमांकाच्या दोन दुचाकी हस्तगत केल्या.
ही कारवाई पोलिस निरीक्षक पराग पोटे, संतोष ताले यांच्या निर्देशात पोलिस उपनिरीक्षक शरद गायकवाड, प्रशांत वंजारी, नरेंद्र कांबळे, वैभव जाधव, श्रावण पवार, गजानन जाचक यांनी केली. पुढील तपास प्रशांत वंजारी करत असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहेत.


