लातूर जिल्हा प्रतिनीधी: – मोहसीन खान
लातूर. दि.8 डिसेंबर 24 रोजी मी अमित वैशाली विलासराव देशमुख म्हणत आमदार अमित राव देशमुख यांनी विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात घेतली आमदारकीची शपथ.
लातूर. “लातूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे अमित देशमुख हे विजयी झाले असून लातूर विधानसभा मतदार संघातील जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने आमदार देशमुख यांनी अमित वैशाली विलासराव देशमुख असे म्हणत आज दिनांक 8 डिसेंबर रोजी सकाळी 11: 00 वाजण्याच्या दरम्यान चौथ्यांदा महाराष्ट्र विधान सभेच्या सदस्यांची शपथ घेतली आहे.
यावेळी त्यांनी लातूर शहर मतदार संघातील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या विश्वासाला कायम पात्र राहण्याचा प्रयत्न राहील असे सांगितले आहे”.


