बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:- सुनील वर्मा
बुलढाणा :- जगप्रसिद्ध लोणार सरोवरापासून जवळच असलेला देऊळगाव कुंडपाळ हा २४०८ दशलक्ष घनमीटर क्षमता असलेला सिंचन प्रकल्प दिनांक २१ रोजी रात्री आलेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने शंभर टक्के सा तव्यांदा भरला असून प्रकल्पा च्या मध्यभागी दगडाच्या पिचिंग वर एक मोठे भगदाड पडून त्यातून पाणी वाहत आहे त्यामुळे सदरचे भगदाड हे आणखी मोठे होण्या चा धोका असून धरणाची भिंतही कोरल्या जाऊन धरण फुटण्या चा धोका निर्माण झाला आहे. धरण १००% भरल्याच्या पार्श्वभूमीवर लघु पाटबंधारे विभागा मार्फत ग्रामस्थांना सतर्क राहण्या चा इशारा दिला आहे.
मात्र क्षेत्रात पाऊस सुरूच असल्याने पाण्याचा विसर्ग कालव्यातून तर होतच आहे परंतु सदर छिद्र पडलेल्या मोठ्या बिळातूनही मोठ्या प्रमाणावर होत आहे या पार्श्वभूम ीवर स्थानिक ग्रामपंचायतीने तथा शिवछत्र मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नंदू मापारी यांनी भिंतीवरील झाडे झुडपे तोडण्याची व घुशी मुळे तेथील जमीन पोकळ झाल्या बद्दलअनेक वेळा पाटबंधारे विभा-गाकडे मागणी करूनही पाटबंधारे विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष केल्या गेले, त्यामुळे सदर धरणाची भिंत वृक्ष झाडामुळे केव्हाचीच ठिसूळ बनली असून धरणातील पाण्याचा दाब लक्षात घेता धरण केव्हाही फ टू शकते अशी शक्यता निर्माण झाल्याने ग्रामस्थात भितीचे वाता-वरण निर्माण झाले आहे
पाटबंध-विभागाने तात्काळ उपायोजना कराव्या अन्यथा होणाऱ्या परिणाम धरणास पाटबंधारे विभाग जबाबदार राहील असा ईशाराही ग्रामस्थांच्या वतीनेही दिला आहे.
या पार्श्वभूमि वर पोलीस पाटील आसाराम खोम णे आणि परमेश्वर नरवाडे यांनी धरणाच्या भिंतीतून वाहणाऱ्या प्रवाह बाबत सद्यस्थितीची पाहणी करून वरिष्ठांना माहिती दिल्याचे समजते.

