मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून दुचाकीचे नुकसान..
बुलढाणा जिल्हा प्रतिनीधी: -सुनील वर्मा
रात्री २ ते ३ वाजे दरम्यान सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे रात्री तीन वाजेच्या सुमारास संतोष रामकृष्ण शेडूते यांच्या ८० फूट लांबी व दहा फ ट उंची असलेली दगड सिमेंट विटा पक्या जुन्या बांधकामाची भिंत कोसळली…
शेजारील रहिवाशी सिराज हुसेन शेख यांची हिरो कंपनीची एचएफ डीलक्स टू व्हीलर २०१६ मॉडल, महबूबशेख रऊफ यांची बजाज कंपनी ची डिस्कवर गाडी तसेच नसीर खान यांची हजार लिटरच्या दोन पाण्याच्या सिंटेक्स टाक्या, शेख समीर शेख अब्बास यांची एक हजार लिटर ची पाण्याची टा की भिंती शेजारी असल्याने भिंत कोसळल्याने अंदाजे दोन ते अडीच लाखाचे सर्व मिळून नुकसान झाले असल्याचे माहिती संतोष शेडूते यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे गजानन जगदेवराव जाधव यांचे माळवद माडी बांधकाम असलेले घराची भिंत माळवद माडी सह पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती लोण-ार तलाठी सचिन शेवाळे यांना मिळतात तात्काळ घटनास्थळी येऊन सचिन शेवाळे तलाठी लोणार यांनी पंचनामा करून शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचप्रमाणे अजून कोणाचे काही नुकसान झाले आहे का याबाबत विचारणा करत आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली.
यावेळी त्यांच्या सोबत प्राध्यापक गजानन जगदेवराव जाधव, संतोष शेडूते, शेख बबलू, यांचे सह नुकसानग्रस्त नागरिक उपस्थित होते

