अकोला विभाग प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
बाळापूरः सततच्या नापिकीने त्रस्त व्याळा येथील प्रवीण माणिकराव सोळंके ३० या शेतकऱ्याने २२ जुलै रोजी दुपारी घरात गळफास लावून जीवन संपवले. तीन एकर शेतीत दोनदा पेरणी करूनही उत्पादन न मिळाल्याने तो तणावात होता. दुपारी घरी कोणी नसताना त्याने घोडनाटीला दोरीने गळफास लावला. वडील घरी आल्यावर घटना उघडकीस आली. त्यांनी शेजाऱ्यांना बोलावून पोलिसांना माहिती दिली.
बाळापूर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. गावात हळहळ व्यक्त होत असून, पुन्हा अन्नदात्याची वेदना समोर आली आहे?

