अकोला विभाग :- गणेश वाडेकर
खदान पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या एका गावातील अल्पवयीन मुलगी व दुसऱ्या गावातील युवकाची इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली.
अवघ्या काही दिवसांतच ओळखीचे रुपांतर प्रेमात होऊन दोघांनी घरातून पळून जाऊन लग्न करण्याच्या आणाभाका घेतल्या. ही बाब मुलीच्या वडिलांना समजताच त्यांनी तातडीने खदान पोलिस ठाण्यात धाव घेऊन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.
अल्पवयीन मुलीचा शोध घेऊन पोलिसांनी तिची विचारपूस केल्यानंतर आरोपीने अत्याचार केल्याची कबुली दिली. याप्रकरणी युवकाला बेड्या ठोकत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे…

