माहिती लपविणारा डॉक्टर ही सह आरोपी
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी:- सिद्धार्थ कदम
डेंगूच्या आजारावर उपचाराकरीता भरती झालेल्या एका अकरा वर्षीय मुलीच्या गुप्तांगाला कंपाउंडरने हात लावला आहे.अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या कंपाउंडर विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहे. तर माहिती लपविणारा डॉक्टरही सह झाला आहे.घटना दि.१९ जुलै २०२५ रोजीच्या रात्री १२ ते ३ वाजताच्या दरम्यान घडली होती.
पीडितेच्या आईने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असता समशेर उर्फ समीर प्रकाश आडे वय २१ वर्षे रा.बोर नगर असे गुन्हे दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
तर सह आरोपी म्हणून क्रिष्णा हॉस्पिटलचा डॉक्टर तुषार पवार यांच्यावरही कलम २१ नुसार शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.
शहर पोलीस ठाण्याच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अकरा वर्षीय मुलीला डेंगू चा आजार झाल्याने तिला क्रिष्णा हॉस्पिटल या बालरोग रुग्णालयात दि. १७ जुलै २०२५ रोजीच्या सकाळी उपचाराकरिता आणले होते.
तिच्या रक्ताची तपासणी केली असता तिला डेंगू चा आजार झाला होता. त्यानंतर दि.१७ जुलै रोजी २०२५ रात्री १२ वाजता तिला सलाईन लावले होते. त्यासोबतच तिच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या देखील ठेवण्यात आल्या होत्या.दि.१८ जुलै २०२५ रोजीच्या रात्री जनरल वॉर्ड मध्ये उपचार घेत असलेल्या मुली सोबत तिची आई देखील होती.सलाई सुरू असताना तिच्या आईचा अचानक डोळा लागला होता.
याचा फायदा घेत तपासणीच्या नावाखाली समशेर उर्फ समीरने तिच्या गुप्त अंगाला हात लावला होता.त्यानंतर अचानक जागी झालेली मुलगी ओरडू लागली होती. ते ओरडणे ऐकून तिची आई झोपेतून जागी झाली होती. त्यानंतर तरुणीला दि.२० जुलै रोजी डॉक्टरने डिस्चार्ज देखील दिला होता.उपचार घेऊन घरी परत आलेल्या मुलीने घडलेली सर्व हकीकत तिच्या आई-वडिलाला सांगितली होती. त्यानंतर तिच्या आई-वडिलांनी डॉ.तुषार पवार यांना सांगितले होते. व त्या कंप्यूटरवर कारवाई करा अशी मागणी केली होती. परंतु डॉक्टरने कुठलीही कारवाई केलेली नव्हती. तो कंपाउंडर नेहमीप्रमाणे दवाखान्यात ड्युटीवर हजर देखील झाला होता.त्यांच्यावर अन्याय झाल्याचे पाहून पिडीतेच्या आई-वडिलांनी शहर पोलीस ठाणे गाठले.
त्यानंतर सर्व हकीकत तक्रारीत नमूद केली होती.शहर पोलिसांनी घटनेच्या दिवशीचे सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन पंचनामा केला होता. त्यानंतर त्याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले आहे.प्रकरणाचा अधिक तपास शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. एकंदरीत या घटनेमुळे तालुक्यात संताप व्यक्त केल्या जात आहे.

