वर्धा:- जगात अनेक खेळ खेळले जातात आपल्या जीवनातील खेळाचे महत्व प्रत्येकाला माहीत असले पाहिजे. कराटे हा खेळ एक कलात्मक खेळ असून आपल्याला लढायला शिकवतात किंबहुना हा खेळ आपल्या स्वतःचा आपल्या कुटुंबातील सदस्यांचा बचाव करतात. या खेळाचे प्रशिक्षण स्वसंरक्षणा सोबतच शासकीय भरतीत 5% टक्के आरक्षणाकरिता व शालेय जीवनात वाढीव 25 गुनाकरिता घेतले जातात.
गती, कौशल्य, तत्परता आणि डावावर खेळाडूंचे जिंकणे व हरणे आधारित असतो. 27 जुलै रोजी दादाजी धुनिवाले मठ वर्धा येथे होणारी विदर्भ स्तरीय “आमदार चषक” कराटे स्पर्धा वर्धा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण विदर्भात क्रीडा क्षेत्राच्या वैभवात भर घालणारी ठरणार आहे.
या स्पर्धेत सर्व कराटे खेळाडूंनी सहभाग नोंदवावा असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री, गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनीकर्म तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी व्यक्त केले.ते शासकीय विश्राम भवनात स्पोर्ट शोतोकान कराटे -डो असोसिएशन ऑफ इंडिया द्वारा आयोजित “आमदार चषक” विदर्भ स्तरीय कराटे चॅम्पियनशिपच्या ऑफिशियल मुखपृष्ठाचे विमोचन करताना बोलत होते.
यावेळी स्पर्धेचे स्वागताध्यक्ष इमरान राही संरक्षक स्पोर्ट कराटे असोसिएशन वर्धा जिल्हा, शिवसेना पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव, स्पर्धेचे अध्यक्ष शिहान मंगेश भोंगाडे राष्ट्रीय अध्यक्ष स्पोर्ट शोतोकान कराटे – डो असोसिएशन ऑफ इंडिया, स्पोर्ट कराटे असोसिएशनचे उपाध्यक्ष मोहन मोहिते, तायकोंडो स्पोर्ट असोसिएशन वर्धा जिल्ह्याचे कार्याध्यक्ष शिहान उल्हास वाघ, माजी खासदार सुरेश वाघमारे, भाजपा वर्धा विधानसभा संघटक पृथ्वीराज शिंदे, मुख्य आयोजक सेन्साई चेतन जाधव, माजी नगरसेवक सतीश वैद्य, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख गणेश इखार, निलेश देशमुख, भाजपा वर्धा तालुका अध्यक्ष गौरव गावंडे आधी अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

