(एक अनुभव आणि त्यातून घेतलेले जीवनाचे शिक्षण)
आपण सर्वांना माहिती आहे, किंबहुना अनेक शास्त्रांमध्ये, ग्रंथांमध्ये मृत्यू हे अंतिम सत्य असल्याचे नमूद केले गेले आहे.
मृत्यू — हा शब्द उच्चारताच आपल्या अंगावर शहारा येतो.
मृत्यू म्हणजे काय? तो कसा असतो?
आपण त्याला का घाबरतो?
काय तुम्हीही घाबरता?
हो, नक्कीच! प्रत्येक जिवंत प्राणी मृत्यूला घाबरतो.
जेव्हा मृत्यू समोर येतो, तेव्हा आपल्या डोळ्यांपुढे घरातील आप्तस्वकीयांचे चेहरे फिरतात –
“हे सर्व माझ्यावर अवलंबून आहेत, माझ्या पश्चात यांचे काय होईल?”
हा विचार मनाला पोखरून टाकतो
कर्तव्ये पार पाडताना आपण स्वतःला हरवतो…
आजचा नोकरदार वर्ग, कर्तव्याच्या जंजाळात इतका गुरफटतो की स्वतःचे आयुष्य जगायलाच विसरतो.
ऑफिसमधील जबाबदाऱ्या
मुलांचे शिक्षण
वृद्ध आई-वडिलांची सेवा व त्यांच्या समस्या
नातेवाईकांची लग्नकार्य व समाजानी थोपलेली कर्तव्ये
हे सर्व निभावताना शरीराची आणि मनाची झीज होत जाते. “रिटायर झाल्यावर जगू,” असे सांगणारे कितीतरी लोक, खऱ्या अर्थाने जगूच शकत नाहीत.
कधी पैशांचा अपुरेपणा, कधी शरीर साथ देत नाही…
मनातले मांडे मनातच राहतात.
तो दिवस… जेव्हा मी मृत्यू अनुभवला!
हा प्रसंग मी कधीही विसरू शकत नाही…
नेहमीप्रमाणे मी कारने ऑफिसला जायचो, पण त्या दिवशी आठवडी बाजारामुळे रस्ता गर्दीचा होता, म्हणून मोटरसायकल घेतली व निघालो
मनात कामाचे विचार होते. VCA चौकात पोहोचलो आणि अचानक एक मारुती व्हॅन विरुद्ध दिशेने आली आणि थेट माझ्यावर धडकली!
फक्त एक जोराचा आवाज, आणि मी रस्त्यावर फेकला गेलो.
डोक्यावर हेल्मेट होते, तरी डोळ्यांपुढे अंधार!
जिवंत आहे की नाही, हेच समजेनासे झाले.
शुद्धीवर आलो, तर मी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पडलो होतो.
माझ्या समोर घरच्यांचे चेहरे तरळू लागले.
प्रश्नांचा पूर मनात उसळला.
हाच का शेवट?
हीच का वेळ?
पण मी स्वतःला सावरलं.
स्थानिक लोकांनी मदत केली, पाणी दिलं.
मी कशीबशी तीच डॅमेज झालेली मोटरसायकल चालवत घरी आलो.
लिफ्ट बंद – तीन मजले पायऱ्यांनी चढून आलो.
मुलीला सांगितलं: “चला हॉस्पिटलमध्ये जाऊ.”
माझा आतेभाऊ सतीश आला, आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो.
सुदैवाने, फ्रॅक्चर नव्हतं, पण खूप मार लागला होता.
सगळ्यात मोठं म्हणजे… त्या क्षणी माझ्या पाठीमागे कोणतेही वाहन नव्हते.
नेहमी जिथे गाड्यांची गर्दी असते, तो रस्ता त्या दिवशी मोकळा होता.
म्हणजेच, मृत्यूने मला अजून वेळ दिली होती!
मृत्यू म्हणजे काय?
मृत्यू म्हणजे शरीराच्या क्रिया बंद होणे नव्हे, तर एक टप्पा, एक संक्रमण!
हे जाणवलं त्या दिवशी.
निसर्गाच्या नियमाप्रमाणे जन्म घेतला की मृत्यू अटळ आहे.
परंतु प्रश्न इतकाच आहे –
तो येईपर्यंत आपण खरोखर “जगतो” का?
निसर्ग आणि मृत्यू: एक समांतर सत्य
निसर्गातील प्रत्येक गोष्ट – झाडं, पक्षी, प्राणी, वेली – सगळं एका ठराविक वेळेनंतर बदलतं, झडतं, मरतं, आणि पुन्हा उगम पावतो.
मृत्यू म्हणजे अंत नव्हे – तो एका नवीन प्रवासाची सुरुवात आहे.
पण माणूस, आपल्या अहंकारामुळे, या सत्याला स्वीकारत नाही.
शेवटी काय शिकायला मिळालं?
स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
कर्तव्यं निभावतानाच स्वतःसाठीही वेळ काढा.
नात्यांचा आस्वाद घ्या, पण स्वतःच्या स्वप्नांनाही वेळ द्या.
मृत्यू कुठल्या क्षणी येईल सांगता येत नाही, म्हणून प्रत्येक क्षण पूर्ण जगा.
“मृत्यू पहिला… पण जीवन नव्याने समजलं!”
आजही तो दिवस आठवतो तेव्हा अंगावर काटा येतो.
पण त्याच अनुभवाने मला जीवनाचं मोल शिकवलं.
मृत्यू टाळता येत नाही, पण त्याच्या आधीचं जगणं अर्थपूर्ण करता येतं.
तुमचंही असं काही अनुभवलं असेल का?
मृत्यूच्या अलीकडचा एखादा क्षण?
जर हो, तर तो अनुभव जरूर शेअर करा.
एकमेकांच्या कथांमधून जीवनाची नवी दिशा सापडते…
लेखक: प्रदीप चौधरी हेल्थ अँड लाइफ कोच 8668466438 H24 FIT CLUB &NUTRI WORLD

