उपमुख्यमंत्री व इतर नेत्यांच्या वर्धा जिल्हा दौऱ्याचे कारण देत प्रशासनाने आंदोलनाची परवानगी नाकारली….
वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे सरकारने नुकत्याच पारित झालेल्या, असंवैधानिक जनसुरक्षा कायदा २०२४ च्या विरोधात आज दिनांक २२ जुलै मंगळवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन आयोजित करण्यात आले होते, परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री व ईतर नेत्यांच्या वर्धा जिल्हा दौऱ्याचे कारण देत प्रशासनाने आंदोलनाची परवानगी नाकारली.फक्त निवेदन तरी देऊ द्या अशी विनंती केली होती, पण ती सुद्धा मान्य करण्यात आली नाही. विषेश म्हणजे वर्धा तहसीलदार यांनी परवानगी दिली होती, पण पोलीस विभागाने नाकारली. भाजप पक्षाचे कार्यक्रम मात्र छत्रपती शिवाजीमहाराज चौकात आयोजित आहे.जनसुरक्षा कायद्यावर अद्याप मा. राज्यपालांची सही व्हायचीच आहे पण फक्त विरोधकांना रोखण्यासाठी तयार झालेल्या या असंवैधानिक कायद्याची अंमलबजावणी चालु झाली, असे यावरून दिसून येते.सत्ताधाऱ्यांच्या कार्यक्रमाला परवानगी देऊन त्याच वेळी विरोधकांना परवानगी नाकारणाऱ्या प्रशासनाचा व महायुती सरकारचा वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे जाहीर निषेध करण्यात येत आहे.

