लातूर जिल्हा प्रतिनिधी:-मोहसीन खान
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष लातूर शहर जिल्ह्याच्या वतीने शहरातील विविध भागांमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
श्री सिद्धेश्वर मंडलाचे अध्यक्ष सुरेश जाधवजी यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास भेट देऊन रक्तदात्यांचा उत्साह वाढवला. अनेक रक्तदात्यांनी या समाज उपयोगी अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.
याप्रसंगी संयोजक श्रीकांत रांजणकरजी,महारक्तदान शिबिराचे लातूर जिल्ह्या संयोजक प्रमोद गुडेजी, मनोज सूर्यवांशीजी,अनिल पतंगेजी,ललित तोष्णीवालजी,संदीप तिवारीजी, संजय गीरजी,मधुसुधन पारिखजी,रविशंकर लवटेजी,संतोष तिवारीजी,अतिश कांबळेजी,करण हाकेजी,सागर घोडकेजी,श्रीनिवास मैनकुद ले जी,मंदार कुलकर्णीजी,यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

