अटी शर्ती मध्ये लिखित आश्वासन दिले आणि आंशन खतम झालेमी पुलागावकर जनता..
विदर्भ विभाग प्रमुख:- युसूफ पठाण
पुलगाव :
14 जुलैपासून अन्नत्याग
आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आले यामध्ये विशेषतः अंकुश भाऊ कोचे द्वारा समस्त दहा ते बारा मुद्दे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या दालनात संबंधित विभागांना निवेदन पत्र व्यवहार देण्यात आले,परंतु शासन-प्रशासनांनी दखल न घेतल्यामुळे या संबंधित विषयावर चर्चा करून आंदोलनाची भूमिका घेतली. या भूमिकेमध्ये गजू भाऊ पचारे जेपी बॉईज संस्थापक अध्यक्ष यांनी खांद्याला खांदा लावून अन्नत्याग उपोषणामध्ये बसले.
यासोबत शिष्टमंडळ मनीष कुमार शाहू,संदीप जी कुचे,विक्की पाखरे,निखिल साखरे,प्रफुल कुंबरे,बंटी ढगे,सचिन मुळे,यश चौधरी,विनोद दुबे,दिनेश जी शर्मा,अॅडव्होकेट अब्दुल सलीम,बेग सर आणि नागपूर येथील समर्थात आलेले गणेश भाऊ चर्चेकर या मध्ये पोलीस प्रशासन ठाणेदार साहेब यशवंत सोळसे यांची मोलाची भूमिका ज्याने कायदा सुव्यवस्था बळकट ठेवा संबंधित विभागांना वारंवार पत्रव्यवहार करून आंदोलनाचे दखल घेत राहिले.
यामध्ये दिनांक 20 तारखेला डॉक्टर ने आमरण उपोषण करता अंकुश कोचे गजू भाऊ पचारे यांना मेडिकल अनफिट सांगितले तेव्हा प्रशासन खडबडून जागे झाले व आमदार साहेब यांनी त्वरित संबंधित विभागाला धारेवर घेऊन मीटिंग केले व संबंधी विभागाचे पाठपुरावा करून तात्काळ निर्णय घेऊन लेटर तयार करण्यात आले यामध्ये सहा ते सात मुद्दे तात्काळ सोडवण्यात आले आणि जे काही निधी अभावी अडकलेले मुद्दे आहे त्याकरिता 30 जुलै ला जिल्हाधिकार्यालय येथे संबंधित विभागाला बोलवून पालकमंत्री तसेच आमदार साहेब यांनी मीटिंग ठेवून 30 तारखेला संबंधित बाकीचे मुद्द्यावर कारवाईचे लेटर देऊ हे आमदार साहेबांनी लेखी स्वरूपात दिले. याप्रकारे पुलगावातील आमजनतेचे प्रश्न सोडवण्यास यश प्राप्त झाले.
प्रश्न मुद्दा क्रमांक-१)राशन कार्ड स्थायी पूलगावात बनणार.
मुद्दा क्रमांक-२)सरकारी हॉस्पिटल येथे सोनोग्राफी मशीन हप्त्यातून एकदा तसेच स्टाफ व समजदार नवनियुक्त डॉक्टरची नियुक्ती करण्यात आले.
मुद्दा क्रमांक-३)पुलगांव रेल्वे स्टेशन ते नाचणगांव चौफुली रस्त्याचे लाइटिंग एक ते दीड महिन्यात चालू होणार त्यानंतर इलेक्ट्रिक पोल,नवीन बोरवेल,जुन्या बोरवेल काढणे.
मुद्दा क्रमांक-४)नाचणगांव दर्ग्याचे सौंदर्यकरण.
मुद्दा क्रमांक-५)लिंबोणी नगर येथील गार्डनचे सौंदर्यीकरण.
मुद्दा क्रमांक-६)पावसाच्या अभावी नाचणगांव ते शिरपूर रस्त्याचे पॅचेस लावायचे काम.
मुद्दा क्रमांक-७)सुरळीत पाणी योजना ह्या मागण्या तात्काळ लेखी स्वरूपात देण्यात आल्या व यानंतर रेल्वे ब्रिज पुलगाव वर्धा नदीवरील छोटे पूल रेल्वे फाटक तसेच नगरपरिषद द्वारे जलसंपदांनासाठी पाच करोड केलेल्या भ्रष्टाचारावर चौकशी या सहित बाकी वरील मुद्द्यावर 30 जुलैला मुद्दे नियमावली काढण्याचे आश्वासन पत्र तसेच मा.जिल्हाधिकार्यालय येथील कलेक्टर मॅडमशी फोनवर बोलणे करून दिले. सर्व जनतेच्या एकतेने मी पुलगावकरला यश प्राप्त झाले. यामध्ये अंकुश कोचे आणि गजू भाई पचारे यांनी मी पुलगावकर जनतेच्या समस्येसाठी स्वतःच्या जीवाचा विचार न करता जनतेसाठी जीव देणे पसंद केले यावर समस्त नागरिक गण एकत्र होऊन आंदोलनाला यश मिळवून देण्याचे काम केले आणि मी पुलगावकर आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला व आंदोलनाला यश प्राप्त झाले हे समस्त मी पुलगावकर जनतेची जीत आहे.
या आंदोलनामधून मी पुलगावकर जनतेला जे म्हणत होते पुलगावचा वाली कोणी नाही तर अंकुश कोचे व गजू भाऊ पचारे नवीन स्वरूपात पुलगाव समस्यावर लढणारे दोन वाली प्राप्त झाले

