अकोला विभाग प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
अकोला – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. अजित दादा पवार यांच्या 66 व्या वाढदिवसानिमित्त मागील वर्षी माजी आमदार स्वर्गीय प्रा. तुकाराम भाऊ बिडकर यांनी कुंभारी सह त्या परिसरामध्ये 5000 कडुनिंबाचे झाड लावून अजित दादा पवार यांचा वाढदिवस साजरा केला होता यावर्षी त्या झाडांना पूर्ण एक वर्षे झाले त्याबद्दल नामदार अजित दादा पवार यांचा वाढदिवस व त्या झाडांचा वाढदिवस संयुक्तपणे राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेश सरचिटणीस श्रीमती राधाताई तुकारामजी बिडकर यांनी सर्व झाडांचा केक कापून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला

यावेळी नामदार अजित दादा पवार यांना कडुनिंबाच्या झाडाप्रमाणे उदंड भरभराटी लाभो ही भावना व्यक्त केली यावेळी परिसरातील लहान मुला मुलींनी प्रत्येक झाडाजवळ उभे राहून केक कापला या सोहळ्याला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सौ प्रतिभाताई अवचार ,महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष गजानन म्हैसने, प्रकाश भाऊ बिडकर, कुमारीच्या सरपंच सौ रुषिकन्या ताई अतकरे, आदर्श शिक्षक श्रीकृष्ण बिडकर, जिल्हा प्रसिद्ध प्रमुख अनिल मालगे ,सेवा दलाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश बोचरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते किशोर तेलगोटे, बाळासाहेब आतकरे, प्रभाकर अवचार, गोपाळ काळे, प्रा. अशोक भराड, प्रा. अपतुरकर, रंजना सिरसाट,रुपाली वानखडे,शितल जंजाळ,अंजनाबाई बोंडे
आगळे महाराज, नारायण नागरे ,सिताराम पवार, यांच्यासह परिसरातील लहान मुलं मुली सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अनिल मालगे यांनी दिली :

