आज दिनांक 22/7/25 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहराध्यक्ष केतन तायवाडे यांचे नेतृत्वात नगरपालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले निवेदनात सांगण्यात आले हिंगणघाट गोल बाजार नगरपालिका परिषद कॉम्प्लेक्स इथे स्थित पन्नास वर्षापासून महाबली हनुमान जी यांचे मंदिर आहे परंतु समाजातील काही नालायक मंदबुद्धी प्रवृत्तीच्या लोकांकडून इथे रोज मंदिराच्या मागे लघु शंका केली जाते
तसेच बाजूच्या गल्लीत घाणीचा खूप मोठा साठा जमा करून ठेवलाय त्याला लागूनच लहान मुलांचे उर्दू शाळा आहे व लोकवस्ती असल्याकारणाने त्यापासून नागरिकांना खूप जास्त त्रास होतोय आणि मुख्य म्हणजे हे सर्व नगरपरिषद इमारतीच्या मागेच आहे संपूर्ण शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या नगरपालिका स्वतःच घाणीच्या साम्राज्यात व्यापलेला आहे त्यातल्या त्यात आठवडी बाजार येथे असलेल्या शंकरजीचे मंदिर व संत शिरोमणी रविदास महाराज यांचे मंदिर आहे त्याच्या बाजूला सुद्धा घाणीचे फार मोठे साम्राज्य साठलेला आहे आणि प्रशासन नगरपालिका यावर कुठलेही लक्ष देत नाही हिंगणघाट शहरात हिंदूवादी संघटना सक्रिय परंतु त्यांना माहित नाही कि माहित असून माहित नसल्याच ढोंग करत आहे
हिंदूवादी पक्ष सुद्धा सत्तेत आहे एकीकडे राम राज्य व हिंदू राष्ट्राच्या डिंगा मारल्या जात आहे आणि रामजी चे सगळ्यात मोठे भक्त यांचे मंदिरच अशा घाणीच्या साम्राज्यात व्यापलेला आहे याला जबाबदार कोण❓
तसेच लाखो हिंदूंच्या मनाला ठेचा पोहोचत असेल याला जबाबदार कोण ❓
लाखो रुपये खर्च करून नगरपालिकेने स्वच्छतागृह बांधलेला आहे परंतु ते अजून पर्यंत लोकार्पित करण्यात आलेला नाही रस्त्यावर नगरपालिकेचे खाजगी ठेक्यात देण्यात आलेले स्वच्छतागृह असून तिथे लघुसंखेचे पाच रुपये चार्ज घेतला जातो अशा वेळेस लोकांकडे लघुशंकेसाठी पर्याय उपलब्ध नाही आणि ह्या सर्व गोष्टीला जबाबदार कोण तर नगरपालिका प्रशासन!महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात जर यावर कुठली कारवाई आपल्याकडं झाली नाही किंवा यानंतर इथे घाण होणार नाही किंवा कोणी लघु शंका करणार नाही यावर कठोर कायदा बसवण्यात आला नाही तर मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने लघुशंका करणाऱ्याला धडा शिकवेल असं करत असताना आपल्या कायदा सुव्यवस्थेला जर ठेस पोचली तर मात्र याला सर्वस्वी जबाबदार नगरपालिका प्रशासन राहणार त्यामुळे वेळेत यावर कारवाई करण्यात यावी,आणि माझी विनंती माननीय आमदार साहेबांना आहे की आपण याच्यावर लक्ष केंद्रित करावे वारंवार होत असलेल्या विटंबनाला आळा घालावा

असे शहर अध्यक्षा कडून बोलण्यात आले हा संपूर्ण निवेदन माननीय जिल्हाध्यक्ष साहेब यांच्या मार्गदर्शनात घेतलं असून या वेळेस उपस्थित पदाधिकारी व मनसैनिक शाहरउपाध्यक्ष कामेश बावणे व अजय खंदार श शहर सह संघटक राम कांबळे, शहर सचिव योगेश नासरे, शहर सल्लागार अभिजीत तायवाडे कार्याध्यक्ष अनिकेत वानखेडे,सर्कल अध्यक्ष रोशन जाधव,सारंग देशपांडे, राहुल बावणे आणि अन्य यांची उपस्थिती होती.

