मोहसीन खान लातूर जिल्हा प्रतिनिधी..
“लातूर शहर महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभागामार्फत जननी रथ उपक्रम राबवला जात आहे. यामध्ये प्रामुख्याने गरोदर माता व पाच वर्ष वयोगटापर्यंतच्या बालकाना रुग्णालयात दाखल होणे साठी मोफत एम्बुलेंस सुविधेचा लाभ दिला जातो. गरोदर महिलांना प्रसूती करिता स्त्री रुग्णालय व विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे रुग्णवाहिकेद्वारे मोफत पाठवले जाते.तसेच प्रसूती झाल्यानंतर रुग्णालयातून परत घरी सोडण्यात येते.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश एकही गरोदर माता घरी प्रसूत होऊन आरोग्याच्या प्रश्न उद्भवू नये हा आहे.सन २०२४-२५ मध्ये १२६ गरोदर महिलांना प्रसूती करिता वरील रुग्णालयांमध्ये मोफत सोडण्याची सुविधा देण्यात आली. तसेच रुग्णालयातून परत ६६ महिलांना घरी सोडण्यात आले.
पाच वर्ष वयोगटापर्यंतच्या जवळपास ५६ मुलांना रुग्णालयामध्ये उपचाराकरिता सोडण्यात आले.
तरी जननी रथ उपक्रमाचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक श्रीमती मानसी यांनी केले आहे. तसेच सदरच्या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होऊन अधिकाधिक नागरिकांना मनपाच्या वतीने आरोग्य सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने उपायुक्त डॉ पंजाब खानसोळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकारी डॉ भारती नियोजन करत आहेत . तरी या सेवेच्या लाभ घेण्यासाठी ९०११०३२२१५, ९६७३६०५५१७ या नंबर वर संपर्क करण्याचे किंवा परिसरातील आशा स्वयंसेविका किंवा नागरी आरोग्य केंद्र च्या कर्मचाऱ्यांना संपर्क साधावा असे आवाहन उपायुक्त डॉ पंजाब खानसोळे यांनी केले आहे.

