सिद्धार्थ कदम
पुसद तालुका प्रतिनिधी
केंद्रीय पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयाने अधिसूचित केलेल्या सुधारित प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम 2021 नुसार राज्यातील एक वेळा वापर प्लास्टिकच्या काही वस्तूंवर सध्या बंदी आहे. तसेच नवीन शासन नियमानुसार 120 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांना देखील वापरास बंदी आहे. पण सध्या पुसद बाजारपेठांमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा वापर हा मोठ्या प्रमाणात होत आहे. भाजी, फळ आणि किराणा माल विक्रेते यांच्या कडून नागरिकांना प्लास्टिक पिशव्यांमध्ये दुकानातील सामान दिले जात आहे.
त्यामुळे पुसद मध्ये प्लास्टिक प्रदूषण मोठया प्रमाणात होत आहे. ही बाब लक्षात घेता पुसद येथील काही पर्यावरणप्रेमी संघटनानी प्रदूषण संरक्षणासाठी काम सुरु केले असुन, गीताई केंद्राच्या शैला सावंत ह्या मागील बऱ्याच वर्षापासून काम करत आहेत त्यांच्यासोबतच काही सामाजिक संघटना एकत्र येऊन त्यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांचे वतीने बहादुरे साहेब यांना आज दिनांक 22 जुलै 2025 रोजी निवेदन देण्यात आले. त्यानुसार नियमबाह्य प्लास्टिक विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर तसेच त्याचा वापर करणाऱ्या व्यक्तीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावे असे निवेदन दिले.
यावेळेस गीताई केंद्राच्या शैला सावंत,अतुल श्रीवास्तव,माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन पुसदचे अध्यक्ष गजानन जाधव,अनंता चतुर,धनंजय आगाम,वसुंधरा बहुउद्देशीय संस्था पुसद चे अमोल गंगात्रे,मिशन ग्रीन भवानी माता टेकडीचे रमेश डंबोळे,अमित हटवार,विनोद शिंदे,जयसिंग राठोड रुग्ण मित्र फाऊंडेशन पुसदचे शांतिसागर इंगोले,नाम फाउंडेशनचे स्वप्नील देशमुख,अमोल उबाळे पाटील,यशवंत देशमुख ,सत्यम महाजन,साखरकर ,प्रतिभा कुशवाह, रामदास सावळे अविनाश शेट्टे,विनायक जोगदंड इत्यादी व सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते…

