अकोला विभाग :- गणेश वाडेकर
अकोल्यात मुदतबाह्य कीटकनाशके बॉटल्स फोडून नव्या बॉटलीमध्ये टाकत असतानाचा प्रकार उघडकीस आला
अकोल्यातील एमआयडीसी भागात व्हि. जे क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कीटकनाशके उत्पादन स्थळावर ही कारवाई करण्यात आली. अकोला MIDC स्थित व्ही. जे. क्रॉप सायन्सस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कीटकनाशके उत्पादन स्थळावर गुप्त माहितीच्या आधारे जिल्हा परिषदेच्या भरारी पथकाने धाड टाकली असता उपस्थित कर्मचारी व मजूर यांच्या मार्फत जुन्या मुदत बाह्य कीटकनाशके बॉटल फोडून त्यामधील कीटकनाशक नवीन बॉटल मध्ये टाकणे, त्यावर नवीन बॅच क्रमांक व उत्पादन दिनांक असलेले स्टिकर लावण्याचे कामकाज सुरू होते.

भरारी पथकाने सुमारे 21 लाखांचा मअकोला जिल्हा कृषी विकास अधिकारी तुषार जाधव यांच्या भरारी पथकाने ही कारवाई केली. या ठिकाणी उपस्थित कर्मचारी व मजूरवर्गाकडून मुदतबाह्य कीटकनाशके बॉटल्स फोडून त्यामधील कीटकनाशके नवीन बॉटलीमध्ये टाकणे, त्याचे वजन करणे व त्यावर नवीन बॅच क्रमांक व उत्पादन दिनांक नवीन स्टिकर लावणे, अशा प्रकारचे कामकाज सुरू होते..



