अकोला विभाग प्रतिनिधि गणेश वाडेकर
अकोला – दरवर्षीप्रमाणे यंदाही जिवती अमावस्येनिमित्त सोमवंशीय क्षत्रीय कासार समाजातर्फे श्री वाळुश्वरी देवीचे दिप पुजन गुरुवार, दि. २४ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी ठिक 7 वाजता श्री कालिका माता मंदिर राजराजेश्वर मंदिर अकोला येथे आयोजित केले आहे.

सर्व समाज बांधवांनी वेळेवर उपस्थित राहावे तसेच बुधवार दि. २३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी श्री कालिका मातेस तेल चढविणे व ज्यांना वाळुश्वरी देवीच्या पुजनाला बसावयाचे आहे त्यांनी महादेवराव मांडेकर व श्रीराम कुटाफळे यांचेशी संपर्क करावा असे जोगवा उत्सव समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे.

