अकोला विभाग प्रतिनिधी गणेश वाडेकर
अकोला – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजित दादा पवार यांच्या 22 जुलै रोजी वाढदिवसानिमित्त सिंदखेड येथील मोरेश्वर महादेव मंदिरात राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या प्रदेश महासचिव श्रीमती राधाताई तुकारामजी बिडकर यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे 22 जुलै ते 30 जुलै पर्यंत जनसेवा सप्ताह आयोजित केला आहे
या अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार तथा विभागीय समन्वयक संजय भाऊ खोडके आमदार अमोल दादा मिटकरी जिल्हाध्यक्ष मोहम्मद बद्रूजमा यांच्या मार्गदर्शनात हा सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.यावेळी नामदार अजित दादा पवार यांच्या हातून शेतकऱ्यांचे व जन सामान्यांची सेवा घडत राहो यासाठी महादेवाला साकडे घालण्यात आले
तसेच अकोला जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावावी यासाठी प्रार्थना करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सौ प्रतिभाताई अवचार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख अनिल मालगे ,सेवा दलाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश बोचरे, , यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी श्रीमती राधाताई बिडकर,सौ प्रतिभाताई अवचार यांना आमदार अजित दादा पवार यांच्या 22 जुलै वाढदिवसानिमित्त पक्षातर्फे 22 जुलै ते 30 जुलै पर्यंत जन विश्वास सप्ताह आयोजित करत असल्याचे यावेळी सांगितले अशी माहिती जिल्हा प्रसिद्धीप्रमुख अनिल मालगे यांनी दिली.

