विदर्भ प्रमुख :युसुफ पठाण
भारतिय राष्ट्रीय काँग्रेस, कमिटी वर्धा जिल्हा द्वारा आयोजित स्थानिक स्वरासंस्था निवडणुक
“एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर”सकाळी 9:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत इंदिरा सदभावना भवन, मगन संग्रहालय समोर, वर्धा येथे आयोजित करण्यात आले होते. यामध्ये संपूर्ण वर्धा जिल्ह्यातील जवळपास 90 च्या वरती प्रशिक्षणार्थीनी नावे नोंदवून सहभागी झाले होते. मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. अर्चनाताई भोमले यांनी केले. तर शुभेच्छापर मार्गदर्शन वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्री मनोजभाऊ चांदुरकर यांनी केले. प्रशिक्षक म्हणून ॲड. अविनाशजी काकडे , श्री जिंदा शंकर सांडभोर पूणे, प्रा. उल्हासराव लोहकरे, यांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीस सामोरे कसे जायचे यासंदर्भात वेगवेगळ्या विषयांवरती प्रशिक्षण दिले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सोशल मीडिया विभाग प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर घोडे यांनी राजकारणात व निवडणूकीमधे सोशल मिडीयाचा वापर करण्याबद्दल मार्गदर्शन केले. ॲड दुर्गाप्रसाद मेहरे यांनी संविधान, आपण व उपक्रम या विषयावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व्हीजेएनटी जिल्हाध्यक्षा सौ.सोनालीताई कोपुलवार यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीकांत धोटे यांनी केले. जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव श्री विजयभाऊ नरांजे व सोशल मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष श्री नरेंद्रभाऊ चाफले यांनी कार्यक्रमाचे आयोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यावेळी प्रामुख्याने वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व विभागीय सेल चे अध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

