अकोला विभाग प्रतिनिधि गणेश वाडेकर
बाळापुर तालुक्यातील निंबी गावात २७ वर्षीय विकृत नराधमाने निष्पाप अल्पवयीन मुलावर वाडग्यात एकटे असताना अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. पाण्यासाठी पाठवलेल्या भावाच्या अनुपस्थितीत आरोपीने संधी साधून हे कृत्य केलं. घडलेला प्रकार पीडित मुलाने पालकांना सांगितल्यावर उरळ पोलिसांत तक्रार दाखल झाली.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पोक्सो सह विविध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करून पोलिस कोठडी मिळवली आहे:

