प्रतिनिधी सगीर शेख खर्डी
गावांसाठी भुयारी मार्ग सेवा रस्त्यांची कामे प्रलंबित पडघा मुंबई नाशिक महामार्गजवळील गावांसाठी भुयारी मार्ग सेवा रस्त्यांची कामे रखडले असल्याने पडघा टोल नाक्यावरील टोल वसुली उद्धवसेना व मनसेने गुरुवारी बंद पाडली आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल नाका सुरू न करण्याचा निर्धार केला हा टोलनाका सध्या बंद आहे शेरेकर पाडा डोहोले कोशिंबी बोरीवली भदाने सेवा रस्ता तयार करणे शेरेकर पाडा भुयारी मार्ग तयार करणे शेरेकर पाडा भुयारी मार्गाचे कार्यारंभ आदेश दोन वर्षापूर्वी निघाले आहेत .
सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत येणारा पडघा कल्याण रस्ता खड्यात गेला आहे या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करा या व इतर 16 महामार्गांचे संचालक श्रीकांत ढगे सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी यांना दिले मोर्चात उद्धवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश भोईर मनसेचे जिल्हाध्यक्ष शैलेश बिडवी भगवान सांबरे उपनेत्या ज्योती ठाकरे उपनेते विश्वास थळे जिल्हाध्यक्ष कुंदन पाटील यासह पदाधिकारी सहभागी झाले होते कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पडघा टोल नाका परिसरात चौख बंदोबस्त ठेवण्यात आला होता

