अकोला विभाग प्रतिनिधि गणेश वाडेकर
सबहेड – शाळकरी विद्यार्थी व मनसेचे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. यांना निवेदन
बाळापूर – बाळापुर तालुक्यातील मौजे सागत ते निंबा या मार्गावर शाळेतील विद्यार्थी पाई ऐने जाणे करतात. सकाळी सात वाजता शाळेवर जाण्याकरिता निघाले असता संपूर्ण रस्त्यावर महिला शौच करण्याकरिता बसतात रस्त्याने जर एखादे वाहन आल्यास विद्यार्थ्यांना रस्त्याच्या कडेला उभे राहण्याकरिता जागा सुद्धा उपलब्ध नाही व रस्त्यावर वाढलेली काटेरी झुडपे आणि रस्त्यावर पडलेले गड्डे यामुळे त्रस्त होऊन सागद गावातील विद्यार्थ्यांनी मनसे कार्यालय गाठले.
त्या विद्यार्थ्यांना घेऊन मनसे जिल्हाध्यक्ष राजेश काळे यांनी जिल्हाधिकारी साहेब यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित संबंधित विभागाला व जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांना त्वरित या संबंधित निवेदनाच्या अनुषंगाने सूचना केल्या. जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांनी त्वरित संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवून सदर तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याचे आदेश दिले. गावातील सर्व विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानून कित्येक महिन्याची समस्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वात जिल्हाध्यक्ष राजेश काळे, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील कराळे, शेखर पोटदुखे, ग्रामपंचायत सदस्य मीराताई गव्हाळे यांच्यामुळे सुटली म्हणून आभार व्यक्त केले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एक समिती गठन करून रस्ता हागणदारीमुक्त करण्याचे आश्वासन दिले व काटेरी झुडपे तोडण्यासंबंधीत व खड्डे बुजवण्यासंबंधी संबंधित विभागाला आदेश दिले.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तायडे, गवारगुरु, सचिन चांदणे, कुणाल जाधव, कुणाल खारोडे, सोनु बानोरकार, अविनाश मुऱ्हेकर, महेश मुळतकर, प्रदीप मकसुद आदींची व शाळकरी मुलांची व सागदच्या महिला व नागरीकांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

