अकोला विभाग प्रतिनिधि गणेश वाडेकर
दोन गटांमधील वाद विकोपाला जाऊन गुरुवारी १७ जुलै रात्री कृषी नगर परिसरात रक्तरंजित हाणामारी झाली. या झटापटीत तलवार, चाकू आणि दगडविटांचा वापर झाला, तसचे हवेत दोन गोळ्या झाडण्यात आल्या. दोन्ही गटांतील सातजण जखमी झाले असून, काहींना गंभीर दुखापत झाली आहे.
कृषी नगरमधील रहिवासी सतीश वानखडे व आकाश गवई यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. ते दोघेही चांगले मित्र होते.
गुरुवारी रात्री आकाश गवई काही मित्रांसह सतीश वानखडे यांच्या घरी आला आणि सतीशला बाहेर काढून त्याच्यावर तलवार व चाकूने हल्ला केला.

