अकोला विभाग पतीनिधी गणेश वाडेकर
पोलिस स्टेशन दहीहांडा येथे कार्यरत असलेले सहायक पोलिस उपनिरीक्षक एएसआय भागवत परसराम कांबळे यांनी तक्रारदार यांना दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी एक लाख रूपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानुसार तडजोडीअंती ५० हजार रूपयांची लाच स्वीकारत असता अकोला अकोट मार्गावरील कासली फाटा येथे कांबळे यांना रंगेहाथ अटक केली.

ही कारवाई अकोला एसीबीने १६ जुलै रोजी केली. प्रकरणातील तक्रारदार याच्याविरुध्द पोलिस स्टेशन दहीहांडा येथे गुन्हा नोंद आहे.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक व पथकाने केली

