अकोला विभाग प्रतिनिधि गणेश वाडेकर
अकोला:- सिटी कोतवाली पोलिस स्टेशन अंतर्गत
मदनलाल धिंग्रा चौकातील अंडरपासमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलिस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी सांगितले की, मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. वैद्यकीय तपासणीनंतरच व्यक्तीच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि मृताची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

