महेंद्र मुनेश्वर : -अध्यक्ष विदर्भ प्रदेश तथा वर्धा जिल्हा रिपाइं (आंबेडकर)
वर्धा: विदर्भ विभाग प्रमुख: युसुफ पठाण
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेला भ्याड हल्ला आणि त्यांच्या तोंडावर शाई फेकण्याची घटना ही अत्यंत दुःखद आणि निषेधार्ह आहे.या घटनेचा वर्धा जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) तर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.अशा प्रकारच्या घटनांनी सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जातो.दोषींवर कठोर कारवाई व्हावी, ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) व बहुजन आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवणाऱ्या पुरोगामी संघटनांची मागणी आहे.
राज्याच्या फडणविस सरकारचे सदरहू निंदनीय घटनेला समर्थन आहे,या भाजप सरकारला हिंदुत्वाचा विचार समाजा समजात पेरुन जातीयवाद घरा घरात पेरायचा आहे.
राज्य सरकारच्या धर्मांधवादी धोरणामुळेच संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्यावर,सनातनी विचाराच्या लोकांनी भ्याड हल्ला करुन त्यांची निघृण हत्या करण्याचा प्रयत्न केला. भटशाही,बुवाबाजी, अंधश्रद्धेला पाठबळ देणाऱ्या अशा आरोपींना राज्याचे मुख्यमंत्री,उप मुख्यमंत्री,गृहमंत्री शिक्षा देणार आहेत की नाही ? बहुजन समाजात शांततेचे वातावरण निर्माण व्हावी अशी आमची अपेक्षा आहे,परंतु प्रत्यक्षात झालेल्या घटनांमध्ये घट होण्याऐवजी त्यात वाढच होताना दिसते,ही बाब अत्यंत चिंताजनक आहे.त्यामुळे मोकाट असलेल्या मुख्य सूत्रधार आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी व राज्य सरकारने पुरोगामी विचाराच्या नेते व कार्यकर्त्यांना स्वरक्षण द्यावे,अन्यथा बहुजन व आंबेडकरी समाज जनआंदोलन करेल ! यातुन झालेल्या हानिला फडणविस सरकार जबाबदार राहील असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या वतीने देण्यात येत आहे.
महेंद्र मुनेश्वर : अध्यक्ष – विदर्भ प्रदेश तथा वर्धा जिल्हा रिपाइं (आंबेडकर)

