पोलीस स्टेशन बार्शीटाकळी हद्दीतील दारू अड्ड्यावर छापा
अकोला विभाग प्रतिनिधि गणेश वाडेकर
मा.श्री. अर्चित चांडक पोलीस अधीक्षक, अकोला यांचे निर्देशा प्रमाणे अकोला जिल्हयामध्ये अवैध धंदयांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबविण्यात आले.
आज दि. १५/०७/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा चे पथकाला मिळालेल्या गुप्त बातमी वरुन शासकीय वाहनाने पो स्टे बार्शीटाकळी हद्दीतील ग्राम नाईक जाम येथे पंचा समक्ष गावठी दारूची दोन ठीकाणी रेड केली असता, आरोपी नामे १) सुनील वामन चव्हाण वय ३८ रा. नाईक जाम ता. बार्शीटाकळी जि अकोला याचे ताब्यात गावठी दारु व सडवा मोहाचा एकूण ४९० लिटर एकूण ७७,७५०/- रुपये चा मुद्देमाल तसेच आरोपी २) नामे गोपाल किशन चव्हाण वय ३८ रा. नाईकजाम ता. बार्शीटाकळी जि अकोला याचे ताब्यात गावठी दारु व सडवा मोहमाच एकूण १२० लिटर एकूण १८२५०/-रुपये चा मुद्देमाल असा एकूण दोन्ही गुन्ह्यात ६१० लिटर गावठी दारु व सडवा मोहमाच एकूण किंमत अंदाजे ९६,०००/-रु चा मुद्देमाल मिळून आल्याने दोन्ही आरोपी कडून जप्त करून आरोपी विरुद्ध कलम ६५ ई, क ड फ महाराष्ट्र दारु बंदी कायाद्यान्यये पो स्टे बार्शीटाकळी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री.बी. चंद्रकांत रेड्डी साहेब, पोनि शंकर शेळके स्थागुशा, यांचे मार्गदर्शना खाली GPSI दशरथ बोरकर, पोहवा गोकुळ चव्हाण, पोकों स्वप्नील खेडकर, अन्सार अहमद, चालक मनिष ठाकरे स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांनी केली.

