अकोला विभाग प्रतिनीधी; – गणेश वाडेकर
अकोला- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे विचार घरोघरी पोहोचवण्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झंझावत दौरा जिल्हाध्यक्ष राजेश काळे यांनी सुरू केला आहे. बाळापुर तालुक्यापासून या दौऱ्याची सुरुवात करण्यात आली असून गाव तिथे शाखा संकल्पनेची सुरुवात करण्यात आली आहे. बाळापुर तालुक्यातील दधम या गावी शाखेचे उद्घाटन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेश काळे यांनी शाखेचे विधिवत उद्घाटन करून गावातील मनसैनिकांना मार्गदर्शन केले. जिल्हा उपाध्यक्ष शेखर पोटदुखे, बाळापुर जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील कराळे यांनी यावेळी मनसैनिकांना मार्गदर्शन केले.
वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष दादा खेते यांच्या उपस्थितीत शाखा उद्घाटन संपन्न झाले. यावेळी ग्राम दधम येथे अंकुश जाधव यांची शाखाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. यावेळी सुभाषभाऊ इंगळे, सोनू जाधव, सचिनभाऊ इंगळे, महादेव घोडके, योगेश घुले, वैभव नागरे, मंगेश चौडकर, अजय सुलताने, अमोल नागरकर, नंदू भाऊ सोनटक्के इत्यादी मनसे सैनिकांसह ग्राम दधम येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

