प्रतिनिधी:- सगीर शेख खर्डी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
शिवसेना ठाकरे व एकदा एकत्र कल्याण मुंबई नाशिक महामार्गावरील पडघा येथील टोलनाका अंतर्गत विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी मनसे शिवसेना ठाकरे गट पुन्हा एकत्र येताना दिसत आहे मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आल्याने पुढील महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून एकत्रित येण्याची सुरू असल्याचे चर्चा सर्वत्र सुरू असून निमित आहे
टोल नाक्या अंतर्गत येणाऱ्या विविध समस्या महामार्गालगत असलेल्या सर्विस रोडवरील खड्डे बुजवणे प्रथमिक आरोग्य केंद्र व भदाणे गावाकडे जाणाऱ्या फुलाखालच्या पाण्याची व्यवस्था करणे पथदिवे लावणे परिसरातील महामार्गाजवळील गावांच्या रस्त्याचे दुरावस्था झालेली आहे ती पूर्ववत करणे तलवली नाका येथील फुलाचे काम भुयारी मार्ग तयार करणे आशा अनेक समस्यांसाठी 17 जुलै रोजी टोल नाका येथी मोठे आंदोलन उभे राहणार असून किमान चार ते पाच हजार नागरिक उपस्थित राहणार आहेत
असे शिवसेना ठाकरे गट उपजिल्हाप्रमुख प्रकाश भोईर यांनी पत्रकारांना सांगितले तसेच नागरिकांनी आंदोलनास उपस्थित राहायचे आवाहन केले आहे

