सिद्धार्थ कदम
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
महागांव /काळी दौ दि 12
माजी आमदार तथा माजी मंत्री
बच्चू उर्फ ओमप्रकाश कडू यांच्या 7/12 कोरा कोरा यात्रा 111 किमी चा प्रवास करत काळी दौ येथे पोहचली असताना पायातून रक्त येत असताना माजी मंत्री बच्चू कडू आपला लढा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढत असल्याने येथील अतहर मिर्झा आश्रमशाळेतील मुख्य कार्यक्रम प्रसंगी संध्या संदेश रणवीर तालुका अध्यक्ष महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांनी आपले मंचावर मनोगत मांडून माजी आमदार बच्चू कडू यांना महागांव तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आंदोलनाला जाहीर पाठिंबा पत्र देत बच्चू कडू यांच्या आंदोलनात मागण्या पूर्ण होईस्तोवर शेतकरी हितार्थ सहभागी राहणार असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
शेतकरी हितार्थ केंद्रीय कृषीमंत्री शरदचंद्र पवार साहेबांनी सर्वात मोठी देशपातळीवरील कर्जमाफी केली असून शेतकऱ्यांच्या सोबत ते नेहमी राहिले असल्याने बच्चू कडू यांच्या मागण्या दिव्यांग, कष्टकरी, निराधार व शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या असल्याने आमचा पक्ष त्यांच्या या 7/12 कोरा पदयात्रेला समर्थन देत असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट करत पाठिंबा पत्र दिले या वेळी राजू रणवीर,मनीष जाधव, दादाराव जाधव,हंसराज मोरे,सुदेश नरवाडे, शरद काळे,संदेश रणवीर, शेख जाकीर,उत्कर्ष इंगोले, रवी राठोड, विकास मोरे,प्रहार चे व विविध पक्षीय पदाधिकारी शेतकरी व काळी दौ येथील गावकरी उपस्थित होते.

