अकोला विभाग प्रतिनिधि गणेश वाडेकर
वर्धा – वर्धा जिल्हा महाराष्ट्र गवळी समाज संघटना, युवा आघाडी महिला आघाडी व विद्यार्थी आघाडी द्वारा आयोजित गवळी समाजातील गुणवंत विद्यार्थी, खेळाडू व विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमांमध्ये प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजभैय्या अहिर यांची उपस्थिती होती त्यांनी आपल्या भाषणामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व आपण समाजाला काही देणे लागतोय याची जाण समाजातल्या प्रत्येक घटकाने ठेवावी तसेच अभ्यास करीत असताना मन, बुद्धि व शरीर या तिन्ही घटकांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करत रहावे असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाला मंचावर गवळी समाज प्रदेशाध्यक्ष हिरामण आप्पा गवळी माजी प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब गलाट, प्रदेश उपाध्यक्ष गोपाळराव अवथळे, उद्धवराव गाडेकर, प्रदेश सचिव अशोक मंडले, प्रदेश महिला आघाडी अध्यक्ष वैशाली अवथळे, माजी प्रदेश उपाध्यक्ष आनंदरावजी कालोकार, सुरेंद्र हुंडीवाले, उत्तमराव काळे, सदाशिवराव खडके, दीपक खताडे व श्रवण मंडले यांची प्रमुख उपस्थिती होती.

विशेष अतिथी म्हणून पोलीस उपनिरीक्षक मुंबई कु. भावना कुंदन वैद्य व आष्टी येथील नवनियुक्त विस्तार अधिकारी हर्षल नामदेवराव कालोकार यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात गोमाता पूजन व दीप प्रज्वलनाने झाली.
ज्या विद्यार्थ्यांनी व खेळाडूंनी प्राविण्य प्राप्त केले आहे अशा विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजन समिती अध्यक्ष देवेंद्र ढोबळे, सूत्रसंचालन अश्विनी गलाट यांनी केले तर आभार मनीष बोपटे यांनी मानले.
या विद्यार्थ्यांचा गुणगौरव
इयत्ता दहावी मध्ये निर्मिती चौकोने, शंतनु नायकुजी, अनुष्का परणकर, तपस्या येवले देवांश अवथळे, कल्याणी अवथळे, नंदिनी महाजन, अमित आसोले, श्रुती साठे, नम्रता येकोतखाने भैरवी चौकोने , उन्नती साठे, गौरी कालोकार, राज गळहाट ईश्वरी अवथळे, स्नेहल अवथळे, वेदिका साठे, खुशी आसटकार, जानवी चौधरी, वर्ग बारावी करिता भार्गवी वैद्य, चंचल अवथळे, साक्षी डोळे, दिक्षिता काळे, वेदिका भागानगरे, मोनिका काटकर, समीक्षा भागानगरे यांचा तसेच गुणवंत खेळाडू म्हणून सार्थक अवथळे, अथर्व चावरे, श्वेता काळे, प्रिया बाबाराव अवथळे व संस्कृती गळहाट यांचा व सी इ टी व इतर परीक्षांमध्ये प्राविण्य प्राप्त विद्यार्थी डॉ. अनुश्री बोपटे, आदित्य कालोकार, नयन चेके, ऋषिकेश कालोकार व आर्यन येवले यांचा अतिथींच्या हस्ते गौरव चिन्ह, प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
….
समजातील नावलौकिक व्यक्तीचा सन्मान
विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेले व्यक्ती मध्ये प्रभाकर काकडे, पुष्पराज कालोकार , शांताराम आसोले , वैशाली अवथळे प्रा. नितीन घोडे शिवाजी चंदिवाले , वसंत कालोकार यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यांनी केले सहकार्य
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता वर्धा जिल्हा गवळी समाज संघटना अध्यक्ष महेश अवथळे, सचिव मोरेश्वर गळहाट, बाबाराव
अवथळे, संजय अरबट, गोविंदराव डोळे, आकाश अवथळे, प्रदीप घोडे, आशिष बोपटे, कुणाल गळहाट, आकाश चेले, जगदीश डोळे, धनराज सपकाळ, कैलास गळहाट, निलेश गळहाट, विशाल घोडे, कपिल डोळे, पंडित कोरडे,, संदीप गळहाट, दत्तराज वैद्य, संदीप कालोकर, केशव
झामरे अतुल वैद्य, महेश डोईजड, रोशन कोरडे, प्रकाश डोळे, धनराज कालोकार, श्याम येवले, धर्मराज वैद्य अमोल सपकाळ, रणजीत अवथळे, अरविंद गलहाट, आशिष अवथळे, मुरली घोडे, चारुलता येवले, कुसुम चेके संदीपा येवले, विनिता सपकाळ, प्रणाली घोडे दिपाली गळहाट, स्नेहा ढोबळे, रूपाली चेके, आदी समाज बांधव व भगिनींनी परिश्रम घेतले.

