अकोला विभाग प्रतिनिधि गणेश वाडेकर
स्व तुकारामजी बिडकर यांचे आशीर्वाद
अकोला – महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस पदी श्रीमती राधाताई तुकारामजी बिडकर यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार व राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लजी पटेल यांच्या अभिप्रेत असणारी संघटना बांधण्यासाठी श्रीमती राधाताई बिडकर यांनी प्रयत्नशील रहावे पक्षाच्या वाढीसाठी व पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्य पर्यंत पोहोचण्यासाठी पक्षाला वाढीसाठी प्रयत्न करावे असे उद्गगार यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काढले यावेळी राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली ताई चाकणकर, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष गजानन म्हैसणे, समता परिषदेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अनिल मालगे समता परिषदेचे बार्शीटाकळी शहराध्यक्ष चक्रधर राऊत, निलेश म्हैसणे यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय , नरिमन पॉईंट मुंबई येथे देण्यात आले यावेळी श्रीमती राधाताई बिडकर यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार तसेच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री नामदार छगनराव भुजबळ तथा अकोला विधान परिषदेचे आमदार अमोल दादा मिटकरी, जिल्हाध्यक्ष मोहम्मद बदूजमा महिला जिल्हाध्यक्ष सौ प्रतिभाताई अवचार यांना दिले.जिल्ह्यात व महाराष्ट्रात पक्ष वाढीसाठी प्रयत्नशील राहील असे म्हटले. अशी माहिती अनिल मालगे यांनी दिली

