अकोला विभाग प्रतिनिधि:- गणेश वाडेकर
मा. श्री. अर्चित चांडक, पोलीस अधीक्षक, अकोला यांचे निर्देशाप्रमाणे अकोला जिल्हयामध्ये अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबविण्यात येत आहे..
दिनांक 14/07/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा अकोला चे पथकाने मिळालेल्या गुप्त बातमी वरून पो स्टे. जुने शहर हद्दीत जैन चौक अकोला येथे तीन तास पत्त्याच्या सहायाने हारजितचा जुगार खेळणाऱ्या इस्मानवर जुगार रेड केली असता एकूण 13 आरोपी पकडून त्यांचे कडून नगदी 55,000 रु, वेगवेगळ्या कंपनीचे 11 मोबाईल ज्याची किंमत 1,01,000/- रु, तसेच 5 वेगवेगळ्या कंपनीच्या मोटर सायकल की 2,50,000 असा एकूण 4,06,000 /- रु मुद्देमाल पंचा समक्ष जप्त केला करण्यात आले. यातील आरोपी नामे 1) नितीन अशोक गोहर 2) अनिल गोवर्धनदास चांडक 3) महेंद्रसिंग त्रिपाल सिंग दिवाकर 4) मोहसीन खान सलीम खान 5) मजर खान जाफरखान 6) शेख राहील शेख आजार 7) मोहम्मद आतिक मोहम्मद हबीब 8) सचिन हेमंत सावळे १) बशीर खान रहू खान 10) शेख रफिक शेख हुसेन 11) भारत हिम्मत जाधव 12) उमेश जुंबन दामले, 13) स्वराज दिलीप सिंग ठाकूर यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन जुने शहर अकोला येथे कलम 4,5 महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे
सदरची कार्यवाही सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री अर्चीत चांडक साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री बी. चंद्रकांत रेड्डी साहेब, पोलीस निरीक्षक श्री शंकर शेळके यांचे मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई Api गोपाल ढोले, HC उमेश पराये, HC खुशाल नेमाडे, PC आकाश मानकर PC अभिषेक पाठक, मो. आमिर, चालक Gpsi ठाकरे, pc खरात स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांनी केली

