विदर्भ विभाग प्रमुख:- युसूफ पठाण
शिवसेना नेते पूर्व विदर्भ संघटक मा. श्री किरण भाऊ पांडव यांच्या मार्गदर्शनात वर्धा जिल्हाधिकारी कार्यालय येथे आपत्ती व्यवस्थापना बाबत जिल्हा प्रशासनाच्या तयारीची माहिती निखिल सातपुते वर्धा शहर प्रमुख यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या शिष्ट मंडळाने जाणून घेतली.
जिल्ह्यामध्ये सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हातील ग्रामीण भागात मोठ्या समस्या उद्भवण्याच्या शक्यता असल्यामुळे प्रशासकीय तयारी बाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी झालेल्या चर्चेमध्ये उपविभागीय अधिकारी वर्धा ,आर्वी , हिंगणघाट यांच्या अध्यक्षते मध्ये आपातकालीन व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी असल्याचे सांगण्यात आले.
तरंग , समुद्रपूर, आर्वी , तसेच वर्धा ,सेलू ,देवळी , आष्टी ,कारंजा या आठही तालुक्याचे तहसीलदार यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापनाची मुख्य जबाबदारी असल्याचे सांगण्यात आले.
या सर्व अधिकारी वर्गांचे मोबाईल नंबर प्रशासनाकडून आपल्या माहिती साठी खालील प्रमाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे.
उपविभागीय अधिकारी
वर्धा 9730218981
आर्वी 7972369756
हिंगणघाट 7666701609
तहसीलदार
वर्धा 8275371394
सेलू 9422154025
देवळी 9325065021
हिंगणघाट 9011060099
समुद्रपूर 9970467824
आर्वी 9850233520
आष्टी 8796370673
कारंजा 9975321150
तरी वर्धा जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांना व नागरिकांना विनंती आहे की
जिल्ह्यात कुठेही अतिवृष्टी मुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास या क्रमांकावर आपण थेट संपर्क साधावा सदर अधिकारी यांच्याकडून आपल्या तक्रारींची योग्य दखल न झाल्यास शिवसेना वर्धा शहर प्रमुख श्री निखिल सातपुते मो नं 9766022941 या क्रमांकावर फोन करून कळविल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातून शिवसैनिकांच्या व नागरिकांच्या तक्रारींची योग्य दखल घेन्या बाबत संपर्क केला जाईल.
यावेळी युवा सेना उपजिल्हाप्रमुख मंगेश भोंगाडे, सुशील शिरे, अशोक भिवगडे, क्रिष्णा नांदुरकर उपस्थितीत होते.
आपला नम्र
निखिल व सातपुते
शिवसेना ( शिंदे गट )वर्धा शहर प्रमुख

