प्रतिनिधी सगीर शेख खर्डी
खर्डी वैतरणा सागर बहुउद्देशीय सोशल ट्रस्टच्या माध्यमातून ‘ एक झाड अनेक श्वास’ या उपक्रमांतर्गत पाचव्या वर्षात पदार्पण होत असून ट्रस्टच्या माध्यमातून अनेक ठिकाणी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता.
दिनांक 12,जुलै रोजी ट्रस्टचे चेअरमन सतीश जयवंत बोर्डे यांनी सुचविल्या प्रमाणे ज्ञानप्रसारक विद्यामंदिर माध्यमिक शाळा आसनगाव च्या प्रांगणात लावण्यासाठी 50 फळ झाड मोफत वाटप करण्यात आली . यावेळी शाळेतील सर्व शिक्षक वृंद व ट्रस्टी उपस्थित होते.
तसेच अभिनव स्कूल आसनगाव च्या प्रांगणात लावण्यासाठी सुद्धा 50 फळ झाडांचे वाटप करण्यात आले. आसनगाव माध्यमिक शाळेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून ट्रस्टचे चेअरमन सतीश जयवंत बोर्डे व उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला. ट्रस्टचे खजिनदार पाप्पा शेख यांच्या सूचनेनुसार दिनांक 12, जुलै रोजी दुपारी 2 वाजता खर्डी येथे उर्दू शाळेत 50, फळझाडांची वाटप करण्यात आले.
त्यावेळी खर्डीतील मुस्लिम बांधव व पत्रकार उपस्थित होते.
दिनांक 13,रोजी दत्त मंदिर वैतरणा येथे ट्रस्टच्या पर्यावरण विभागाचे संचालक रमेश दुबेले यांच्या सूचनेनुसार मंदिर परिसरात फळझाडे लावण्यासाठी 50 फळ झाडांची वाटप करण्यात आले. वृक्ष वाटप उपकार्यक्रमाचे कार्याध्यक्ष दशरथ गायकवाड,वन अधिकारी पर्यावरण विभाग प्रमुख सल्लागार मदतनीस उमाकांत आव्हाड, बंडू घायवट, सोमनाथ डिंगोरे, पापा शेख, संजय खडपे, विठ्ठल गायकवाड ,पुंडलिक गोडे, आनंद जाधव, संतोष खरपडेहे नेहमी तन मन धनाने उपस्थि राहून सहकार्य करतात .
बीएमसी ऑफिसर याटकर साहेब अरुण रांजलकर यांनी मुंबईवरून येऊन विशेष उपस्थिती दर्शवली होती.ट्रस्टचे सह खजिनदार संतोष घरत,हेमंत परते, भगवान वाडू , अक्षय कुंदे विवेक जाधव व पत्रकार प्रकाश जाधव,शगिर शेख, इ उपस्थित होते.
वैतरना सागर बहुद्देशीय सोशल ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी सामाजिक उपक्रम राबविले जातात व पर्यावरणाची काळजी घेऊन एक झाड अनेक श्वास या कार्यक्रमात अंतर्गत फळझाडे लावून समाज्याला एक चांगला संदेश ट्रस्टचे अध्यक्ष सतीश जयवंत बोर्डे यांनी दिल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक होत आहे.

