मोहसीन खान लातूर जिल्हा प्रतिनिधी.
आज दि.13 जुलै 25 रोजी सायंकाळी लातूर शहरातील प्रभाग २ मधील जुना मळवटी रोड नूतनीकरण आणि डांबरीकरण कामाचे सहकाऱ्यांसह उपस्थित राहुन भूमोपूजन केले.
या कामावर जिल्हा वार्षिक योजना ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण योजनेतून या कामावर ३३ लाख ४३ हजार ७२१ रुपये खर्च होणार आहेत.
रस्त्याचे हे काम अत्यंत दर्जेदार पद्धतीने वेळेत पूर्ण करावे अशा सूचना याप्रसंगी संबंधित अधिकारी व कंत्राटदारांना दिल्या आहेत. यावेळी परिसरातील जनतेशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या त्या त्वरित सोडवण्यात येतील अशी ग्वाहीही त्यांना दिली.

