अकोला विभाग प्रतिनिधि गणेश वाडेकर
पोलीस अधिक्षक श्री अर्चीत चांडक साहेब यांनी जिल्हयातील अवैध धंदे कारवाइ करीता “ऑपरेशन प्रहार” योजना राबवत असुन गोवंश तस्करी व वाहतुक करण्यावर कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहे आज दिनांक १२/०७/२०२५ रोजी पोलीस स्टेशन बार्शीटाकळीला गोपनीय माहिती प्राप्त झाली
की एका पांढ-या रंगाच्या महिन्द्रा सुप्रो गाडी क एम.एच. ३० बि.डी ७७६९ या गाडीचा चालक हा गाडीमध्ये दोन गोवंश जातीचे बैल कुरतेने दोरखंडाने बांधुन कटाइ करीता वाहतुक करीत आहे, अशी माहिती प्राप्त होताच पो. स्टॉफ पो. हे. कॉ बोरसे ब.न.५४० पो.कॉ अमोल ब.न. १३३७ पो.कॉ योगेश ब.न. १८६७ सह मिळलेल्या माहिती प्रमाणे सायंकाळी १९. ०० वा दरम्याण घटनास्थळी जावुन सदर ठिकानी नाकाबंदी करून महान पिंजर कडुन येनारी महीन्द्रा सुप्रो गाडी क्र. एम.एच.३० बि.डी ७७६९ थांबवुन दोन पंवा समक्ष गाडीचे मागचे साइडने पाहणी केली असता
तिथे ०२ गोवंश जातीचे बैल कुरतेने दोरखंडाने बांधलेले मिळुन आले. किंमत अंदाजे प्रत्येकी ४५००० हजार रु प्रमाणे असे दोन बैल किंमत ९०००० रु.चे मिळून आले तसेच महीन्द्रा सुप्रो गाडी ची किंमत ४,५०,००० रू असे एकुन ५,४०,००० रू चा मुद्देमाल जप्त करुन पो. स्टे ला आणुन गोवंश जातीचे बैल पुढील देखरेखी करीता व संगोपणा करीता आदर्श गोसेवा संस्थान, म्हैसपुर येथे दाखल केलेसदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री अर्चीत चांडक साहेब, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री अभय डोंगरे साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सतिश कुळकणी साहेब यांचे मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस स्टेशन बार्शीटाकळीचे पोलीस निरीक्षक प्रवीण धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन बार्शीटाकळी चे पो. हे. कॉ अविनाश बोरसे ब.न.५४०, पो कॉ अमोल हाके, पो कॉ योगेश ब.न. १८६७, यांनी केली आहे. पुढील तपास ठाणेदार सां यांचे मार्गदर्शनात पो. हे. कॉ राजेश जौंधरकर ब.न. ५५७ हे करत आहेत.

