अकोला विभाग प्रतिनिधि गणेश वाडेकर
मा. श्री. अर्चित चांडक, पोलीस अधीक्षक, अकोला यांचे निर्देशाप्रमाणे अकोला जिल्हयामध्ये अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबविण्यात येत आहे..
दिनांक १२.०७.२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त बातमी वरून श्री शंकर शेळके पोलीस निरीक्षक स्थागुशा अकोला यांनी निर्देश दिल्या वरुन खाजगी वाहनाने पो स्टे रामदास पेठ अकोला हद्दीमध्ये गुरुद्वारा चे समोर प्रो रेड केली असता, आरोपी नामे नरेश श्रीकृष्ण तेलगोटे वय 24 वर्ष रा मच्छी मार्केट अकोट फाईल अकोला याचे ताब्यातून नमूद घटनास्थळावरून प्रति 180 ml चे 192 सीलबंद कॉटर्स, कि अं 15360/- रुपये व एक पांढऱ्या रंगाची होंडा कंपनीची एक्टिवा मोसा क्र MH30 BJ 0215 कि अं 70000 रु असा एकूण 85360/- रु चा मुद्देमाल पंचा समक्ष जप्त करून आरोपी विरुद्ध कलम 65 (ई) महाराष्ट्र दारूबंदी कायाद्यान्वये पो.स्टे रामदास पेठ अकोला येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
सदरची कार्यवाही सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री अर्चीत चांडक साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे साहेब, पोलीस निरीक्षक श्री शंकर शेळके यांचे मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई PSI पठान साहेब HC उमेश पराये, HC शेख हसन, PC श्रीकांत पातोंड PC अभिषेक पाठक स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांनी केली.

