आमदार भीमराव केराम यांच्या प्रयत्नाचे मोठे फलित.
प्रतिनिधी :- महेश्वर ठाकरे माहुर नांदेड
श्रीक्षेत्र माहूर आ.भीमराव केराम यांनी दिलेले लेखी निवेदने, नोंदविलेले निरक्षण व केलेली वस्तुनिष्ठ मांडणी या बाबींची केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्राल्याने गंभीर दखल घेतली आहे. त्यानुषंगाने तांत्रिक सल्लागार बाळासाहेब ठेंग यांनी दि. 29 जून रोजी एकाचवेळी तीन पत्रे काढून तातडीने तृतीय-पक्ष सुरक्षा ऑडिट करून दोष दुरुस्त करण्याचे व अपूर्ण अप्रोच रस्त्याची कामे पूर्ण करण्यासह धनोडा येथील नवीन पुल वापरात आणण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे माहूर शहरातून जाणाऱ्या महामार्गवरील रेंगाळलेली सर्वच कामे पूर्ण होण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.

माहूर शहरातून जाणाऱ्या धनोडा ते कोठारी या 161 ए या महामार्गांवरील पथदिवे सुरु करणे, सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याने नालीचे बांधकाम पूर्ण करणे,सर्व्हिस रोडलगत पेवर ब्लॉक बसविणे, रुंदीकरणात झालेला मोठा भेदाभेद निकाली काढणे, जुन्या पुलावरून सुरु असलेली वाहतूक अतिशय धोकादायक असल्याने नवीन पुल वाहतुकीसाठी खुला करणे आदी गंभीर प्रश्नी आ.भीमराव केराम यांनी सातत्याने पाठपुरावा करून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे लक्ष वेधले. त्यामुळे उपरोक्त कामे लवकरच पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच वनसदृश्य जमिनीचे प्रकरण परिवेश पोर्टलवरून मार्गी लावणे कामी राज्य वनविभाग आणि पर्यावरण मंत्रालयाशी समन्वय साधन्याचे बाळासाहेब ठेंग यांनी निर्देश दिल्याने वन सदृश्य जमिनीमुळे मालवाडा घाटासह अन्य रखडलेली इतर कामे सुद्धा लवकरच पूर्ण होण्याचे सुचिन्ह दिसू लागले आहे.



