आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- कविता धुर्वे
राळेगाव:-राळेगाव तथा जिल्हा प्रमुख मा.श्री प्रफुल्ल चौहाण यांच्या नेतृत्वात प्रतिनिधी शिवसेना शिंदे गटाचे शहर संघटक, सामाजिक चळवळीत सदैव अग्रेसर राहणारे, आदिवासी समाजाचे युवा नेतृत्व संदीप पेंदोर यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना.अशोक उईके यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षात शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश घेतला,शिंदे गटाच्या नेत्यांनी विश्वास गमावलेल्यांना अनेकांना पक्षात प्रवेश दिल्याने प्रामाणिक शिवसैनिकांमध्ये तालुक्यात नाराजीचा सुर उमटत होते. याची परिनीती आज अखेर अनेक शिवसैनिकांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला असल्याची प्रतिक्रिया संदीप पेंदोर यांनी दिली आहे.
अशोक उईके यांच्या नेतृत्वावर व श्री संदीप पेंदार यांचे खंदे समर्थक राळेगाव तालुका शिवसेना शिंदे गट
पक्ष प्रवेश करणारे पदाधिकारी संदीप पेंदोर राष्ट्रीय कर्मचारी सेना शिंदे गट महाराष्ट्र सरचिटनीस तथा शहर संघटक राळेगाव व आदिवासी तालूका प्रमुख,हनुमान शशिवरक शाखा प्रमुख वरूड जहागिर,बंडू संगेवार विभाग प्रमूख झाडगाव,मंगेश ढोके माजी विद्यार्थी सेना तालूका प्रमुख ग्राम पंचायत सदस्य करंज(सो),गणेश बरडे माजी उपजिल्हा प्रमुख विद्यार्थी सेना तथा माजी तंटामुक्ती अध्यक्ष झाडगाव,किसनाजी वैदय माजी सरपंच कळमनेर इत्यादी नी भाजपा पक्षाचे कार्य अधिक जोमाने करणार असल्याचेही त्यांनी यावेळी माध्यमाशी बोलतांना सांगितले आहे.

