राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार ) पक्षाच्या अकोला पूर्व ब्लॉक अध्यक्षपदी काशिनाथ बागडे
अकोला विभाग प्रतिनिधि गणेश वाडेकर
अकोला :-आगामी महानगरपालिका निवडणूक संदर्भात स्थानिक शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)पक्षाच्या वतीने तातडीचे बैठकीचे आयोजन महानगर जिल्हाध्यक्ष मो.रफीक सिद्दिकी यांनी केले होते. या बैठकीत शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अकोला निरीक्षक गणेश राय यांच्या समोर आपापले मत मांडले ,बैठक शांततेत पार पाडली.बैठक झाल्यानंतर या बैठकीत अकोला शहरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस( शरदचंद्र पवार) पक्षामध्ये गेल्या अनेक वर्षापासून पार्टीच्या माध्यमातून काम करीत असलेल्या कार्यकर्त्यां वर जबाबदारी देण्यात आली त्यामध्ये पूर्व ब्लॉक अध्यक्षपदी काशिनाथ बागडे यांची अकोला निरीक्षक गणेश राय यांनी नियुक्ती पत्र देऊन निवड केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्याम बाबु अवस्थी, अकोला महानगर जिल्हाध्यक्ष मो.रफिक सिद्दिकी, महानगर कार्याध्यक्ष देवाभाऊ टाले, माजी नगरसेवक फरीद पहेलवान, पश्चिम विधानसभा अध्यक्ष मेहमूद खान पठाण, अल्पसंख्यांक अध्यक्ष वसीम खान, अकोला महानगर सचिव जमील खान, जेष्ठ जावेद जकारिया, सैय्यद युसुफ अली, पापाचंद्र पवार, रमेश नाईक, अमन घरडे, मिलिंद गवई, एडवोकेट संदीप तायडे, सरलाताई वरघट, शेख अजीज सिकंदर, करण दौड, शेख मेहबूब, मेहबूब मंटुवाले, यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ता उपस्थित होते यावेळी पार्टीेचे पूर्व ब्लॉक अध्यक्ष
काशिनाथजी बागडे यांचा कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार व सन्मान करण्यात आला

