गणेश राठोड
यवतमाळ जिल्हा प्रतिनीधी
उमरखेड:- येथील क्रिकेट अकॅडमी चे प्रशिक्षक (कोच ) राहुल भगत यांना पंजाब राज्यातील चंदिगड शहरात क्रिकेट चे उत्कृष्ट कोच म्हणून पुरस्कार व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
पंजाब मधील चंदिगड शहरात मुलांसाठी १९ वर्ष वयोगटातील ४६ वी ऑल इंडिया शहिद भगतसिंग क्रिकेट चॅम्पियन्स स्पर्धा संपन्न झाली असून या स्पर्धेत राहुल भगत यांनी ज्या संघासाठी प्रशिक्षक म्हणून काम केले होते. त्या क्रिकेट संघातील खेळाडूंनी या स्पर्धेतील सर्व सामने जिंकत ही मानाची व प्रतिष्ठेची असलेली चॅम्पियन्स ट्रॉफी मोठ्या दिमाखात जिंकली आहे. याकरिता महागाव तालुक्यातील फुलसावंगी या छोट्या गावातील लहानश्या खेळाडूंना प्रोत्साहन देत क्रिकेट चे धडे गिरवून उत्तम कौशल्य देणाऱ्या राहुल भगत यांना त्यांच्या मेहनतीचे फळ पंजाब राज्यातील चंदिगड शहरात संपन्न झालेल्या क्रिकेट स्पर्धांमध्ये मिळाले आहे, क्रिकेटच्या प्रशिक्षण क्षेत्रात छोट्याशा गावातून मोलाची कामगिरी करणाऱ्या राहूल भगत यांचे पंजाब राज्यात संपन्न झालेल्या स्पर्धेतील मान्यवर मंत्री महोदय यांच्या हस्ते उत्कृष्ट कोच म्हणून सन्मानित केले आहे. पंजाब राज्यामध्ये मिळालेल्या यशाबद्दल राहुल भगत यांचे महागावसह फुलसावंगीआणि तालूक्यातून कौतुक केले जात आहे.

