गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी :- आशिष लाकडे
ब्रम्हपुरी शहर हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. ब्रम्हपुरी शहरातील देलनवाडी वॉर्ड येथील कु. तनया राजेश गेडाम हिने राज्यसेवा (MPSC)2023 अंतर्गत सं. अभियंता वर्ग 2 (राजपत्रित )अंतिम घोषित निकालमध्ये यश संपादन केले.
या पूर्वीही कु. तान्याने 10वी हिंदू ज्ञान मंदिर, 12वी डॉ. आंबेडकर कॉलेज ब्रम्हपुरी. बी टेक (सिव्हिल ) पुणे इंजिनीरिंग कॉलेज. येथून उत्तुंग यश प्राप्त केले होते.
सध्या ती वी. येन आय टी नागपूर येथे एम टेक करीत आहे.
तिच्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

