प्रतिनीधी: – नागनाथ लांजे
अहमदपूर तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतींच्या आगामी निवडणुकांसाठी उत्सुकतेने वाट पाहिली जाणारी गाव-निहाय सरपंचपदाची आरक्षण सोडत दि ११ जुलै २०२५ रोजी दुपारी प्रशासकीय इमारत बैठक हॉल अहमदपूर येथे जाहीर झाली.
या सविस्तर आरक्षणामुळे तालुक्यातील ग्रामीण राजकारणाची दिशा पूर्णपणे बदलली असून, प्रत्येक गावातील राजकीय घडामोडींना आता प्रचंड वेग आला आहे.
अहमदपूर तहसील कार्यालयात सकाळी ११ वाजल्यापासून सुरू झालेल्या या सोडत प्रक्रियेत उप -जिल्हाधिकारी मंजुषा लटपटे तहसीलदार उज्वला पांगरकर गटविकास अधिकारी यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, गावकरी आणि सरपंचपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
अत्यंत पारदर्शक पद्धतीने, चिठ्ठ्या काढून प्रत्येक ९७ ग्रामपंचायतींमधील सरपंचपदासाठी अनुसूचित जाती (SC) : – मोहगाव, येस्तार, ढाळेगाव, रुई ,मोळवण, वंजारवाडी,हिप्परगा कोपदेव, हिंगणगाव, मावलगाव ,अनुसूचित जाती महिला : – गुट्टेवाडी,सिंदगी, बु.येलदरवाडी, रुध्दा ,गादेवाडी, केंद्रेवाडी, चिलखा, मुळकी, सुमठाणा,
उजना अनु.जमाती (ST) महीला : – गंगाहिप्परगा,टाकळगाव का, अनु.जमाती : – लेंडेगावना.मा.प्र ( OBC ) : – किनगाव, उमरगा कोर्ट, देवकरा, ब्रम्हपुरी, नागझरी, कोपरा, आंबेगाव, माकणी ,कोकणगा ,खरबवाडी, हंगरगा ,धसवाडी ,अंधोरीना.मा.प्र महीला :- कुमठा बु, चोबळी, शिरुर ताजबंद, सोरा ,उन्नी ,काळेगाव, परचंडा, बेलूर, वरवंटी, लांजी/तांबटसांगवी, सावरगाव रो,राळगा, हाळणी,सर्वसाधारण : – खंडाळी, हाडोळती, आनंदवाडी, कौडगाव, गुगदळ ,टेंभुर्णी, तळेगाव, तेलगाव, बाबळदरा, माळेगाव खु ,गुंजोटी, गोताळा, बोडका, मानखेड ,मेथी, शिवणखेड खु ,सुनेगाव शेंद्री, हगदळ, मांडणी, कोळवाडी, धानोरा बु., सावरगाव थोट, मोघा, वायगावसर्वसाधारण महीला : – चिखली, वळसंगी, सांगवी सु, अजनी खु, किनी कदु ,खानापूर मो ,तिर्थ, धनोरा खु, नरवटवाडी ,सय्यदपुर खु ,सलगरा, हासर्णी, उमरगा यल्लादेवी, दगडवाडी, नागठाणा, लिंगदाळ, विळेगाव, शेनकुड, सताळा, सिंदगी खु, हिप्परगा काजळ, हिप्पळगाव, नांदुरा बु. ,नांदुरा खु., थोडगा यांसह महिलांसाठीच्या आरक्षित जागा निश्चित करण्यात आल्यागावनिहाय आरक्षणाचे प्रमुख परिणाम: – बदललेली राजकीय गणिते :- अनेक ग्रामपंचायतींमध्ये विद्यमान सरपंचांना किंवा त्यांच्या गटाला धक्का बसला आहे, कारण त्यांच्या गावातील सरपंचपद आरक्षित झाले आहे. यामुळे नवीन चेहऱ्यांना आणि तरुण नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महिला नेतृत्वाला मोठी संधी : – ९७ ग्रामपंचायतीं पैकी निम्म्याहून अधिक गावांमध्ये (सुमारे ४८-४९) सरपंचपद महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे ग्रामीण विकासात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. अनेक गावांना प्रथमच महिला सरपंच मिळणार आहेत.
इच्छुकांमध्ये निराशा आणि आनंद :- जाहीर झालेल्या गावनिहाय आरक्षणामुळे काही गावांमध्ये सरपंचपदासाठी तयारी करणाऱ्या इच्छुकांमध्ये नाराजी पसरली आहे, कारण त्यांच्या प्रभागात आरक्षण बदलले आहे. तर, अनेकांना अनपेक्षितपणे संधी मिळाल्याने आनंदाचे वातावरण आहे.
त्वरित राजकीय हालचाली :- आरक्षण जाहीर होताच गावागावात राजकीय हालचालींना वेग आला आहे. संभाव्य उमेदवारांनी जनसंपर्क आणि गटा-तटाच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. काही ठिकाणी संभाव्य उमेदवारांची नावे निश्चित करण्याच्या दृष्टीने बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.
पुढील रणनीतीची आखणी : – आता राजकीय पक्ष आणि स्थानिक नेते प्रत्येक गावातील आरक्षणाचे विश्लेषण करून पुढील रणनीती ठरवत आहेत. पॅनेल तयार करणे, नवीन उमेदवार शोधणे आणि युती-आघाडी करण्यावर भर दिला जात आहे.या गावनिहाय सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीमुळे अहमदपूर तालुक्यातील ९७ गावांमध्ये आता खरी निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. लवकरच निवडणूक आयोगाकडून प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची अपेक्षा असून, त्यादृष्टीने गावागावांत राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे.

