मुंबईत दोन्ही नेत्यांचा भाजपात प्रवेश
चाकूर | प्रतिनिधी – नवनाथ डिगोळे
चाकूर तालुक्यातील राजकारणाला नवा वेग देणाऱ्या घडामोडीत, दोन महत्त्वपूर्ण नेत्यांनी आज भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे.
कपील माकणे – प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते व चाकूर नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष
निळकंठ मिरकले – चाकूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती
या दोघांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह मुंबईत आयोजित विशेष कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला.
प्रमुख उपस्थिती:
रविंद्र चव्हाण – प्रदेशाध्यक्ष, भाजपा
डॉ. गोपछडे – खासदार
संभाजी पाटील निलंगेकर – माजी मंत्री
आजित कव्हेकर – भाजपा नेते
आर्चना पाटील चाकूरकर – महिला नेत्या
या प्रवेशामुळे भाजपला चाकूर तालुक्यात निश्चितच मोठे बळ मिळाले आहे. त्यामुळे येथील राजकीय समीकरणे बदलतील, अशी चर्चा जनतेत सुरु झाली आहे.
प्रश्नचिन्हं आणि अपेक्षा:
या प्रवेशामुळे जुने-नवे वाद आणि गटबाजी पुन्हा उफाळणार का, हे पाहावे लागेल. मात्र, या बदलांमुळे चाकूर तालुक्याच्या विकासाला नवे वळण मिळेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

