अकोला विभाग प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
खदान पोलिस स्टेशन हद्दीतील कौलखेड परिसरातील शाळेमागे एका ३२ वर्षीय युवकावर चार मारेकऱ्यांनी धारदार शस्त्र चाकू व लोखंडी पाइपने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुनील सखाराम घोलप यांच्या तक्रारीवरून पोलिस स्टेशन येथे गुरुवारी रात्री तक्रार दाखल केला आहे.
हिंगणा फाट्याजवळ तीन ते चार युवकांनी घोलप यांना शिवीगाळ करत लोखंडी पाइप व चाकूने डोक्यावर व पाठीवर मारहाण केली. पोलिसांनी मारेकऱ्यांविरूध्द गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास सुरू आहे.

