गणेश राठोड
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी /
महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या तीर्थक्षेत्र जेजुरी येथे सोमवारपासून चंपाषष्ठी षडरात्र उत्सवास प्रारंभ झाला.
पौराणिक काळात ऋषी मुनींना त्रास देणाऱ्या मणी व मल्ल दैत्यांचा संहार करण्यासाठी महादेवाने मल्हारी मार्तंडाचा अवतार धारण करून चंपाषष्ठीच्या दिवशी दैत्यांचा वध करून विजय मिळवला. हे युद्ध मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्ठीपर्यंत ६ दिवस चालले होते. चंपाषष्ठी हा दिवस विजय दिन म्हणून ही साजरा केला जातो.
फुलसावंगी येथील खंडोबाच्या मंदिरामध्ये मार्तंड भैरव मूर्तीला दही-दूध व तेलाने जल अभिषेक केला.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी येथील धनगर समाज बांधव चंपाषष्ठी दिवशी विधीवत तळी उचलण्याचा कार्यक्रम केला. काल शनिवार महाकाली मंदिरा जवळील खंडोबाच्या मूर्ती समोर तळी उचलण्यात आली. यावेळी रघुनाथ बाभळे, कांशीराम वैद्य, कुणाल नाईक, डॉ.गजानन वैद्य, भगीरथ नाईक ,राजेश वैद्य ,गजानन वैध्ये ,परशराम ढाले, बाळु नाईक,अनंता नाईक ,मनीष ढाले,गजानन वैद्य तथा शेकडो समाज बांधव उपस्थित होते.


