पुणे विभाग : सचिन दगडे
पुणे : तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे लिफ्टच्या बहाण्याने एका ज्येष्ठ नागरिकाची चैन लांबवली. माळी मळा रोडने कैलास भुजबळ हे त्यांच्या दुचाकीहून त्यांच्या दुकानात जात असताना रस्त्यात त्यांना तिघांनी हात करत एकाने मला तळेगावात जायचे आहे, तुमच्या सोबत घेऊन चला, असे म्हटल्याने कैलास हे त्याला दुचाकीवर बसवत असताना बाजूला उभ्या असलेल्या दोघांनी कैलास यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सोन्याची चैन हिसकावली.तिघेजण त्यांच्या जवळील दुचाकीहून पळून गेले. याबाबत कैलास सावळेराम भुजबळ (वय ६०, रा. माळीमळा, तळेगाव ढमढेरे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तीन युवकांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे हे करत आहे.


